१६ मेपासून पुन्हा आयपीएलची धूम?

24 प्राईम न्यूज 12 May 2025
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम १६ मेपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याने उर्वरित सामने खेळवण्याचे नियोजन बीसीसीआयकडून सुरू झाले आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
बीसीसीआय व आयपीएल प्रशासकीय समितीने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरीसच आयपीएल पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्व संघांनी त्यांच्या विदेशी खेळाडूंना पुन्हा भारतात बोलावण्यास सुरुवात केली आहे. येत्या २० जूनपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार असल्याने, खेळाडूंना किमान २० दिवसांचा विश्रांती कालावधी मिळावा, यासाठी ३१ मेपूर्वी आयपीएल संपवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

याआधी आयपीएलच्या हंगामातील ७४ पैकी ५७ सामने पार पडले होते. मात्र धरमशाला येथे पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यादरम्यान १०.१ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रकाश टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सामना अर्धवट राहिला. त्यानंतर स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आली होती.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, “देशातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. केंद्र सरकारशी चर्चा करूनच पुढील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सर्व गोष्टी अनुकूल ठरल्या, तर काही दिवसांतच आयपीएल पुन्हा सुरू होईल.”
युद्धजन्य स्थितीमुळे स्थगिती आली होती. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतातील २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ६ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रत्युत्तर देत ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ८ मे रोजी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत