अमळनेर कोर्टात दोन महिला न्यायाधीशांच्या बदल्या; आणखी एक वरिष्ठस्तर न्यायालय मंजूर..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील न्यायालयात कार्यरत असलेल्या दोन महिला न्यायाधीशांची बदली झाली असून, येथील कोर्टात आणखी एक दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालय सुरू होणार आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
अमळनेरमध्ये सध्या तीन जे.एम.एफ.सी. (Judicial Magistrate First Class) कोर्ट आहेत. त्यामध्ये दुसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी एस.एस. जोंधळे मॅडम यांची बदली धाराशिवला करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.

त्याचप्रमाणे तिसऱ्या सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी ए.यू. यादव मॅडम यांची बदली वाशिम येथे झाली आहे. त्यांचीही जागा सध्या रिक्त आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर, म्हणजेच जून महिन्यानंतर नव्याने बदलून आलेले दोन जे.एम.एफ.सी. न्यायाधीश अमळनेर कोर्टात रुजू होतील, असा अंदाज आहे.
दरम्यान, अमळनेरला आणखी एक वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय सुरू होत असून, न्यायाधीश वसावे यांची अमळनेरला बदली झाली आहे. हे दुसरे वरिष्ठस्तर कोर्ट असेल. यापूर्वी येथे न्यायाधीश पी.पी. देशपांडे हे एकमेव सिनियर डिव्हिजन कोर्ट सांभाळत होते. आता या न्यायालयांची संख्या दोन झाली आहे.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत