मांडळ येथे आदर्श हायस्कूलच्या 2001-2002 बॅचचा स्नेहमेळावा संपन्न; शाळेला प्रोजेक्टर देण्याचा संकल्प…


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे दिनांक 9 मे 2025 रोजी आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, मांडळ येथील 2001-2002 दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सुमारे 60 ते 65 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. चव्हाण सर, पूरकर सर, माळी सर, दोरीक सर, किरण सर, बी. बी. पाटील सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूरकर सरांना देण्यात आले होते. त्यांनी तसेच किरण सरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्नेहमेळाव्यात 2001-2002 बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक प्रोजेक्टर भेट देण्याचा संकल्प केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत