“अमळनेरमध्ये आज वयोवृद्धांसाठी मोफत सहाय्यक साहित्य वितरण शिबिराचे आयोजन.”

0

आबिद शेख/ अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%


भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून वयोवृद्धांसाठी सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मा. खासदार सौ. स्मिताताई वाघ यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या सहकार्याने हे शिबिर १२ मे २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे पार पडणार आहे.

या दिवशी केवळ ६० वर्षांवरील वयोवृद्धांची व त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप साधारण २ महिन्यांनंतर करण्यात येईल.

शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे:
१. मूळ आधार कार्ड व झेरॉक्स प्रत
२. मूळ रेशन कार्ड (पिवळे/केशरी) व झेरॉक्स प्रत
३. रेशन कार्ड नसल्यास उत्पन्नाचा दाखला

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र वयोवृद्ध नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!