लोण चारम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरिता निंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
लोण चारम (ता. अमळनेर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सरिता निंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत पी. एस. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामसेवक विनोद पाटील व तलाठी भूषण पाटील यांनी सहाय्य केले.

या निवडीप्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, लोण बु. येथील माजी लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील, साळुंखे सर, निंबाजी पाटील, ताराचंद पाटील, माजी सरपंच मंदा पाटील, सीमा पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सौ. सरिता पाटील यांचा बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, काशिनाथ पाटील, सुरेश पाटील, शालिक पाटील, विवेक पाटील, प्रदीप पाटील व युवराज पाटील यांनी सत्कार केला. यानंतर गावात आनंदात मिरवणूक काढण्यात आली.