“आता हेड कॉन्स्टेबल तपासणार गुन्हे : राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय”


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 86850/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71750/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 975/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
24 प्राईम न्यूज 16 May 2025. -राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर वेळीच आणि जलद नियंत्रण मिळवण्यासाठी गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गुन्ह्यांची उकल जलदगतीने व्हावी आणि पोलीस दलातील मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार, हेड कॉन्स्टेबलला तपास अधिकार देण्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये संबंधित पोलीस हेड कॉन्स्टेबल पदवीधर असावा, त्याने किमान ७ वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, तसेच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथील ६ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
राज्यातील वाढती गुन्हेगारी, विशेषतः सायबर फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, पोलीस दलातील अपुरी मनुष्यबळ ही मोठी अडचण ठरत होती. त्यामुळे अनेक वेळा गुन्ह्यांचा तपास लांबणीवर पडत होता. यावर उपाय म्हणून हेड कॉन्स्टेबलना तपास अधिकार दिल्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रक्रियेत गती येणार आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी फक्त पोलीस उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार होता. आता हेड कॉन्स्टेबल या पदालाही तपासाचे अधिकार देण्यात आले असून, गृह विभागाने याबाबतचा अधिकृत राजपत्रही जारी केले आहे.