अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने शहराचे लक्ष वेधले; खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सैन्यदलांना सामूहिक अभिवादन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर– भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन आणि राष्ट्रप्रेम जागविण्याच्या उद्देशाने १९ मे रोजी अमळनेर शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडली.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87950/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 985/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
या यात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली. विशेष आकर्षण ठरले ते सुमारे २०० फूट लांब तिरंगा ध्वज, जो नागरिकांनी एकत्र हातात धरून मिरवणूक काढली. ओपन जिप्सीमधून डॉ. डिगंबर महाले यांनी तिरंगा हातात घेऊन यात्रेचे नेतृत्व केले. डीजेमधून सुरू असलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.

या यात्रेत मंगळग्रह सेवा संस्था, खानदेश शिक्षण मंडळ, लायन्स क्लब, रोटरी क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मराठा समाज महिला मंडळ, आयएमए, निमा, होमिओपॅथी असोसिएशन, मुंदडा फाऊंडेशन, प्रताप महाविद्यालय, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी, व्यापारी संघटना, पत्रकार संघटना, विविध राजकीय पक्ष व मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रॅली पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, पावलीदेवी मंदिर, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक, कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पोहोचली. येथे खा. वाघ यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. यानंतर झालेल्या समारंभात त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसेच भारतीय लष्कराचे कौतुक करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले यांनी केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे संसदरत्न पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल अमळनेरकरांतर्फे खा. स्मिता वाघ यांचा मंगळग्रह संस्थेतर्फे जंगी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला.
ही तिरंगा यात्रा अमळनेरच्या इतिहासात देशप्रेमाचे प्रतीक म्हणून नोंदवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.