भाजपच्या मीरा-भायंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन यांची नियुक्ती; जैन समाजाच्या प्रतिनिधित्वाला मिळाली प्रतिष्ठा..

आबिद शेख/अमळनेर
भायंदर – भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद अधिक बळकट करत मीरा-भायंदर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन यांची नियुक्ती केली आहे. ही घोषणा मंगळवारी भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेनंतर जाहीर करण्यात आलेल्या ५८ जिल्हाध्यक्षांच्या यादीत दिलीप जैन यांचे नाव ठळकपणे समोर आले आहे.

मीरा-भायंदर परिसरात जैन समाजाची संख्या मोठी असून, या समाजाचा स्थानिक राजकारणात निर्णायक प्रभाव मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर या समाजातील अनुभवी आणि सक्रिय नेत्याला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देणे, भाजपने घेतलेला एक रणनीतिक निर्णय मानला जात आहे दिलीप जैन यांचे शिक्षण अमळनेर येथे प्रताप कॉलेज येथे झाले आहे दिलीप जैन हे अमळनेर येथील अशोक डागा यांचे भाचे आहेत.