निम, पाडळसरे, तांदळी, बोहरे शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर; केळी, पपई, आंबा पिकांचे मोठे नुकसान..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालक्यातील निम, पाडळसरे, तांदळी व बोहरे शिवारात काल सायंकाळी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. मान्सूनपूर्व बेमोसमी पावसामुळे कापणीच्या अंतिम टप्प्यात आलेल्या केळी, पपई व आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे आडवी झाली असून, पपईचे फळे झाडावरून खाली पडले आहेत. आंब्याच्या झाडांवर असलेली कैरी व पिकलेले आंबे गळून पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले असून, हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.