वादळी पावसाने कळमसरेसह परिसरात थैमान – शेतीपिकांचे मोठे नुकसान..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
तालुक्यातील कळमसरे, निम, तांदली, पाडळसरे, शहापूर, वासरे, खेडी, खरदे आदी गावांमध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा चटका बसला आहे.

नुकतीच कापणी केलेली मका, बाजरी, तसेच चारा याचे मोठे नुकसान झाले आहे. निम येथे सुमारे 10 ते 15 मिनिटे सुपारीएवढ्या आकाराची गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेखर गुजर यांच्यासह परिसरातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
कळमसरे परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. खरदे गावातील शेतकरी सर्जेराव पाटील यांच्या शेतातील विहिरीवरील सोलर पॅनल उडून गेले आहे.
सध्या अनेक शेतकरी मका, बाजरी, भुईमूग आणि चाऱ्याची काढणी करत असताना, या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लक्षात घेता, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.