बौद्धिक-शारीरिक युवा श्रमसंस्कार छावणीसाठी तयारी जोरात – पर्यावरण संवर्धनासाठी 3000 झाडांचे लक्ष्य!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या बौद्धिक शारीरिक युवा श्रमसंस्कार छावणीसाठी तयारी जोमात सुरू आहे. “थोडी मजा, थोड्या गप्पा, बाकी श्रमदान” या अनोख्या संकल्पनेतून युवकांना शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक श्रमसंस्कारांची अमूल्य शिकवण दिली जाणार आहे.

या छावणीचे मुख्य आकर्षण म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारी विशेष मोहीम – 3000 झाडांचे लावणी, संगोपन व संवर्धन! यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू असून, ही छावणी निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि श्रमाची कदर या मूल्यांवर आधारित असेल.
आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हा!
आपला आर्थिक, शारीरिक आणि बौद्धिक सहभाग या छावणीच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान हे सर्वसामान्य माणसाच्या सहभागाने, सहकार्याने आणि ताकदीने उभे राहील, हा दृढ विश्वास आमच्यासोबत ठेवा.
युवा, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींना विनंती – या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी व्हा आणि समाजनिर्मितीत आपला मोलाचा वाटा उचला.