साई इंग्लिश अकॅडमी व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साई इंग्लिश अकॅडमी, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर आणि वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल गुलाब समसोददीन पिंजारी (वनक्षेत्र, पारोळा – प्रादेशिक) यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “जगभरात पर्यावरणाशी संबंधित समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे. कोरोना काळात सर्वांनी ऑक्सिजनचे महत्त्व अनुभवले. वृक्ष हेच प्राणवायूचे खरे स्रोत असून वृक्षारोपण व संगोपन ही काळाची गरज आहे.”

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोपांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला मिळालेली रोपे आम्ही आमच्या घराच्या परिसरात, शेतात लावून त्यांची रोज काळजी घेऊ आणि वाढदिवसही वृक्षारोपण करून साजरे करू.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी केले. पर्यावरणाविषयी घोषवाक्यांचे सादरीकरण कु. कल्याणी पाटील हिने केले. सूत्रसंचालन कु. नेहा पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन कु. हिमानी पाटील हिने मानले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालक, शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मनोज कापुरे, वनपाल वैशाली साळी मॅडम, वनपाल सुनिता धनगर मॅडम, वनरक्षक श्री. दिनेश देवरे, वनरक्षक सिमा शिंदे मॅडम व वनमजूर दिनेश सैदाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून वृक्षारोपणाच्या संस्कारांचे रोपण निश्चितच झाले, हे विशेष!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1025/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **