साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम! — जुन्या साड्यांपासून तयार झालेल्या 5000 कापडी पिशव्या भाजी विक्रेत्यांना भेट.


आबिद शेख/अमळनेर
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने एक अनोखा व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जुन्या साड्यांपासून तयार करण्यात आलेल्या 5000 कापडी पिशव्या भाजी विक्रेत्यांना विनामूल्य भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमाचा उद्देश प्लास्टिकमुक्त बाजारपेठ निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे आहे.

या वेळी स्मारकातील सक्रिय कार्यकर्ते चेतन भाऊ सोनार, दर्शना ताई पवार, लोकेश वाणी, प्रदीप भाऊ अग्रवाल, नाना धनगर, शिव निकम, श्याम पाटील, उदय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर युनियन बँकेचे मॅनेजर चौधरी सर, शोएब, अख्तर, जावेदा, भारती महाजन, सुरेश महाजन यांचाही सहभाग उल्लेखनीय ठरला.

हा उपक्रम वर्षभर नियमित राबविण्यात येणार असून, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, आपल्या घरी असलेल्या जुन्या साड्या दर्शना पवार यांच्याकडे जमा कराव्यात.
🌱 पर्यावरण वाचवा – आपला आणि आपल्या मुलांचा भविष्यासाठी!
साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान यांच्या “पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि संगोपन” या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
पर्यावरण मित्र बना – 9075570510 वर संपर्क साधा.