अमळनेरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड मोहिम राबविली

0

आबिद शेख/अमळनेर


रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1025/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज दिनांक ५ जून रोजी अमळनेर नगरपरिषदेतर्फे शहरात विविध ठिकाणी वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गणेश कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, स्वामी विवेकानंद शाळा, शाह नूर शहा दर्गा परिसर आदी भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

ही मोहिम सकाळी ८ वाजता सुरू झाली. प्रत्येक प्रभागातील मुकादम यांनी आपल्या अधिनस्त सफाई कर्मचारी व नागरिकांसह स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात केली.

या वर्षी जागतिक स्तरावर “प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन” ही संकल्पना घेऊन पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदेची IEC टीम प्लास्टिकमुक्तीबाबत आणि पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापरासाठी शहरात जनजागृती करत आहे.

या उपक्रमात नागरिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, शहराच्या स्वच्छतेसाठी आणि हरिततेच्या दिशेने एकत्रित प्रयत्न करूया.

कार्यक्रमावेळी मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी श्री. रवींद्र चव्हाण, बांधकाम अभियंता श्री. सुनील पाटील, अजित लांडे, विद्युत अभियंता कुणाल महाले, लेखापाल कृणाल कोष्टी, स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे, कर निरीक्षक रवींद्र लांबोळे, लौकिक समशेर, प्रभाग मुकादम सिद्धार्थ मोरे, अनिल बाविस्कर, गौतम मोरे, गौतम बिऱ्हाडे, शहर समन्वयक गणेश गढरी, युनूस शेख, श्याम करंदीकर, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे तसेच महिला हौसिंग ट्रस्टच्या महिला पदाधिकारी योगिता मालुसरे, वैशाली चौधरी व इतर महिला कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“चला, एकत्र येऊन अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवूया!”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!