393 व्या शिवजयंती निमित्त 393 वृक्षरोपण करून शिवजयंती साजरी…

एरंडोल (प्रतिनिधि)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 जयंतीनिमित्त विचारांच्या सोबत कृतिशील शिवजयंती या संकल्पनेखाली शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात ही संकल्पना राबवून 393 व्या जयंती

निमित्त 393 वृक्षांचे वृक्षारोपण एरंडोल नगर परिषदेतर्फे पद्मालय रोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात वरती करण्यात आले.झाडे ते लेकुरे आपली लेकरासारखी जपावी असं आज्ञापत्र काढून वृक्ष संवर्धनाचा पहिला संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. याच छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा जपत जपत नगरपालिकेने हा वृक्षारोपणाचा अभिनव प्रयोग राबवला. यात संपूर्ण भारतीय प्रजातीचे वृक्ष महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात सांगितलेली काही वृक्षाचे रोपण सर्व नगरपरिषद कर्मचारी तसेच अनेक सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून सर्व नागरिकांनी नगरपरिषदेला वृक्ष संवर्धनाच्या या मोहिमेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना व जयजयकारने करण्यात आली.