शेतकरी नुकसान भरपाईसाठी लढा. – अमळनेरमध्ये महाविकास आघाडीचे घोषणा आंदोलन

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर– महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या जुन्या निर्णयात बदल करून ती फक्त दोन हेक्टरपर्यंत मर्यादित केल्याने राज्यभरातील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर या अन्यायकारक शासन निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने अमळनेर येथे जोरदार घोषणा आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह समोर महाराणा प्रताप चौकात होणार असून, या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणून जुना निर्णय पुन्हा लागू करण्याची मागणी करणार आहे. याबाबत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी शेतकरी बांधव, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याची वेळ आल्याचे सांगत, त्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होईल, असे स्पष्ट केले आहे.