अमळनेरमध्ये २३ जूनला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर — मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्था यांच्यातर्फे सोमवार, २३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत श्री मंगळग्रह मंदिर, चोपडा रोड, अमळनेर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला ना. गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी आणि आर. झूणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
शिबिराचे आयोजन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. नावनोंदणी २३ जून रोजी शिबिरस्थळीच केली जाणार आहे.
रुग्णांनी लक्षात ठेवावयाच्या सूचना:
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड व रेशन कार्डाच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात औषधोपचार सुरु असल्यास – मधुमेह किंवा रक्त पातळ करणाऱ्या गोळ्यांसह डॉक्टरांची फाईल अनिवार्य उपाशीपोटी यावे – शिबिराला येताना चहा किंवा नाश्ता घेऊ नये ऑपरेशनसाठी निवड झाल्यास – टिफिन आणि पांघरूण सोबत ठेवावे त्याच दिवशी पनवेल येथे मोफत रुग्णवाहिका सुविधेने नेले जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये जेवणाची व राहण्याची सोय उपलब्ध असेल कुटुंबातील कोणत्याही एक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सोबत असावा डोळ्यांच्या गंभीर समस्या असणाऱ्यांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा तालुक्यातील गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.