राष्ट्रीय डॉक्टर डे ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे उत्साहात साजरा; रुग्णमित्रांनी डॉक्टरांचा केला सत्कार..

आबिद शेख /अमळनेर

अमळनेर ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात आणि आदरभावनेने साजरा करण्यात आला. लोकसेवा मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या रुग्णमित्र सेवेतर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एम. पाटील व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने रुग्णमित्रांनी बाह्यरुग्ण (OPD) आणि अंतररुग्ण (IPD) विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना गुलाब पुष्प देत कृतज्ञता व्यक्त केली.
रुग्णमित्र उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध सेवा व माहिती देतात. चिठ्ठी कुठे काढायची, OPD नंबर, वॉर्डची स्थिती, तपासण्यांचे ठिकाण, रक्ताची गरज इत्यादी बाबतीत ते निस्वार्थ मदत करतात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भावनिक व मानसिक आधार मिळतो.
या कार्यक्रमासाठी उपस्थित रुग्णमित्रांमध्ये श्री. प्रदीप साळवी, श्री. भरतसिंग परदेशी, श्री. तुषार कोळी, श्री. धनराज पाटील, श्री. महावीर मोरे, श्री. सचिन शिंदे, श्री. अनिल घासकडबी, श्री. चंद्रशेखर ब्रम्हे, श्री. डी. डी. पाटील, श्री. मनोज शिंगणे तसेच डॉ. शशिकांत चिंतामणी (देवगिरी प्रांत रुग्णमित्र – पूर्णवेळ) यांच्यासह इतर रुग्णमित्र उपस्थित होते.