२५ लाखांचा भाग्यवान कोण? अमळनेर येथून विकले गेले तिकीट ठरले ‘तेजस्विनी’!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र तेजस्विनी मासिक लॉटरी”ची शुक्रवार, २० जून २०२५ रोजी सोडत जाहीर झाली असून, या लॉटरीचा प्रथम क्रमांकाचा भव्य बक्षीस — तब्बल २५ लाख रुपये — अमळनेर येथून विकल्या गेलेल्या तिकीटाला लागले आहे. त्यामुळे, “या २५ लाखांचा भाग्यवान कोण?” असा प्रश्न सध्या अमळनेर शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या भाग्यवान तिकीटाची विक्री विकास लॉटरी एजन्सी, सानेगुरुजी शॉपिंग मार्केट, अमळनेर येथून करण्यात आली होती. त्यामुळे भाग्यवान विजेत्याने कोठारी बंधू, संचालक, विकास लॉटरी एजन्सी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एजन्सीमार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, या लॉटरी सेंटरमधून याआधीही अनेक जण लखपती झाले आहेत. मात्र, राज्यभरातून प्रथम क्रमांक अमळनेरच्या तिकिटाला लागल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता पसरली आहे. विजेता अद्याप पुढे आलेला नसला तरी, तो कोण असणार याकडे संपूर्ण अमळनेरवासियांचे लक्ष लागले आहे.