डॉ. शरद बाविस्कर: सेवा, संवेदना आणि संकल्पाचं प्रतीक..

0

आबिद शेख/अमळनेर


हजारो नवजातांचे जीव वाचवणारे तज्ञ डॉक्टर
१९ वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉ. शरद बाविस्कर हे नवजात अर्भक व बालरोग तज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो गंभीर नवजात अर्भकांवर यशस्वी उपचार केले असून, त्यांच्या कौशल्यामुळे तालुका व जिल्ह्यातील असंख्य कुटुंबांना आधार मिळाला आहे. बालरोग उपचारांतील त्यांची हुकमत आणि समर्पण आजही लोकांमध्ये विश्वास निर्माण करतं. सेवाभावाचं उदाहरण
डॉ. बाविस्कर यांचा दवाखाना २४ तास रुग्णसेवेसाठी ओळखला जातो. आपत्कालीन प्रसंगी मिळणारी तत्काळ वैद्यकीय मदत, माफक दरात मिळणाऱ्या सुविधा, आणि गरजूंसाठी दिलं जाणारं आर्थिक सहकार्य – हे सर्व त्यांचं रुग्णांप्रती असलेलं निस्वार्थी प्रेम दर्शवतं. “प्रत्येक बाळाला वाचवण्याचा निर्धार” हेच त्यांचं कार्यधर्म आहे. डॉ. बाविस्कर हे वैद्यकीय सेवा देण्यासोबतच एक कुशल चित्रकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या चित्रकलेला अमळनेर परिसरात भरभरून दाद मिळते. याचबरोबर त्यांनी अलीकडेच कायद्याची पदवीही मिळवली आहे, जेणेकरून समाजहितासाठी वैद्यकीय सेवा आणि कायदेशीर मार्गदर्शन यांचा संगम साधता येईल.

समर्पण, सेवाभाव, आणि बहुआयामी व्यक्तिमत्व यांचं मूर्त स्वरूप म्हणजेच डॉ. शरद बाविस्कर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!