“उधना – पंढरपूर स्पेशल ट्रेनला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी”. – खासदार स्मिताताई वाघ यांचा पुढाकार फळास आला

आबिद शेख/अमळनेर

पंढरपूरच्या वारीसाठी निघणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने ‘उधना – पंढरपूर स्पेशल ट्रेन’ ला अधिकृत मंजुरी दिली असून, ही गाडी 4 व 5 जुलै 2025 रोजी धावणार आहे. या स्पेशल गाडीची परतीची व्यवस्था 5 व 6 जुलै रोजी करण्यात आली आहे.
ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. स्मिताताई वाघ यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी रेल्वे मंत्री मा. अश्विन वैष्णव तसेच पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांनी ही मागणी प्रभावीपणे मांडली, आणि अखेर त्याला यश मिळाले.
स्पेशल गाडीची माहिती :
गाडी क्र. 09079/09080 – दिनांक : 4 जुलै 2025
गाडी क्र. 09081/09082 – दिनांक : 5 जुलै 2025
परतीचा प्रवास : 5 व 6 जुलै 2025
मार्ग : उधना – नंदुरबार – अमळनेर – धरणगाव – जळगाव – मनमाड – पंढरपूर
खासदार स्मिताताईंनी सांगितले की, “वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, ती श्रद्धेची, भक्तीची आणि संस्कृतीची चालती परंपरा आहे. या यात्रेसाठी