दिवाळीनंतर होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; प्रभाग रचना प्रक्रियेला वेग.

0

24 प्राईम न्यूज 24 Jun 2025

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेबाबतची सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सध्या एकूण २९ महानगरपालिका, १५४ नगरपरिषदा आणि १४३ नगरपंचायती आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संस्थेची प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेला ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रारूप सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ड’ वर्गातील महानगरपालिकांनी १३ ऑक्टोबरपर्यंत, तर नगरपरिषदांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपले प्रारूप अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेने यासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित केले आहे:११ ते १६ जून: प्रगणक गटाची मांडणी व प्रारूप तयार करणे १७ व १८ जून: जनगणनेची माहिती तपासणी १९ जून ते ४ जुलै: स्थळ पाहणी ५ ते १० जुलै: गुगल मॅपवर नकाशा तयार करणे ११ ते २४ जुलै: प्रभाग हद्दीवर तपासणी २२ ते २८ ऑगस्ट: प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवणे २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर: हरकतींवर सुनावणी ९ ते १५ सप्टेंबर: शिफारशी अंतिम करणे १६ ते २२ सप्टेंबर: अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करणे ३ ते ६ ऑक्टोबर: अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे

या संपूर्ण प्रक्रियेमुळे निवडणुकांची घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता कमी असून, निवडणुका दिवाळीनंतरच होण्याचे संकेत मिळत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!