गुन्हेगारीवर लगाम! अमळनेर व चोपड्यातील अट्टल गुन्हेगार हद्दपार..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगार मोज्जम शेख शब्बीर याला एक वर्षासाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच चोपडा तालुक्यातील पिंप्री येथील संजय रवींद्र इंगळे याला पाच तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गांधलीपुरा परिसरातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावर चोरी, घरफोडी, मालमत्ता नुकसान, मारहाण व एनडीपीएससह तब्बल सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या त्रासामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे पाठवला. चौकशीअंती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 56 (1)(अ)(ब) नुसार मोज्जम याला एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. त्याला दरवेळी नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे बंधनकारक असेल.

दरम्यान, अडावद पोलीस स्टेशन अंतर्गत पिंप्री येथील संजय रवींद्र इंगळे याच्यावर विनयभंग, मारहाण व दादागिरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्याविरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी प्रस्ताव पाठवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी संजय इंगळे याला चोपडा, यावल, रावेर, धरणगाव व अमळनेर या पाच तालुक्यांतून तीन महिन्यांकरिता हद्दपार केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!