भव्य मशाल मोर्चा अंमळनेरमध्ये संपन्न. – राहुल गांधींच्या भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यांना पाठिंबा..

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : नोव्हेंबर २०२४ मध्ये पारपडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे अमळनेर तहसील कार्यालय व प्रांत कचेरीवर मशाल मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते देखील मोर्चात समाविष्ट झाले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व राज्यपाल सी पी राधाकृष्णन याना नायब तहसीलदार प्रशांत धमके व शिरस्तेदार जोशी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र विधानसभेतील भ्रष्टाचार प्रकरणांवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज अंमळनेर शहरात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज

नाट्यगृहापासून छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून २३ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मशाल मोर्चा तहसील कार्यालयावर निघाला. तहसील कार्यालयावर मोर्चा येताच सभेत रूपांतर झाले. यावेळी युती सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ बी एस पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, मुफ्ती हारून नक्वी, माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, तुषार संदानशीव, धनंजय चौधरी यांनी केले होते.

या मोर्चामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात मशाली घेऊन घोषणाबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जात जनतेचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला. या वेळी राहुल गांधी यांनी उचललेल्या प्रश्नांवर जनतेमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या मोर्चाने अंमळनेरमध्ये काँग्रेसचा जनाधार पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!