अमळनेरमध्ये सिंगल युज प्लास्टिकवर कडक बंदी — नियमभंग करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई!

0

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर नगरपरिषदेने केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरात सिंगल युज प्लास्टिकवर कडक बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या स्वाक्षरीने एक अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खालील वस्तूंवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे:

बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची यादी:

हँडल असलेल्या किंवा नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक डिश, बाऊल, कंटेनर, डबे ,आईस्क्रिम काड्या, झेंडे, कानकोरणी, स्टॉ, प्लास्टिकची कटलरी,थर्माकोल/पॉलिस्टायरीनपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू मिठाई बॉक्स, सिगारेट पाकिटांची प्लास्टिक आवरणे 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पाऊच किंवा बॅनर

सशर्त वापरासाठी परवानगी असलेल्या वस्तू:

५० मायक्रॉनपेक्षा जाड आणि योग्य लेबल असलेले प्लास्टिक पॅकेजिंग, कंपोस्टेबल प्लास्टिक केवळ रोपवाटिका, फलोत्पादन आणि घनकचरा संकलनासाठी

दंडात्मक कारवाईचा तपशील:

पहिला नियमभंग: ₹5,000 दंड,दुसरा नियमभंग: ₹10,000 दंड,तिसरा नियमभंग: ₹25,000 दंड व 3 महिने कारावास,

नगरपरिषदेकडून सर्व दुकानदार, व्यवसायिक, वितरक व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियमभंग आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!