खानदेश शिक्षण मंडळाच्या ‘इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’ला M.C.A. अभ्यासक्रमास मान्यता..

आबिद शेख/अमळनेर
येथील प्रताप महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’ या विभागाला AICTE, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून M.C.A. (Master of Computer Application) अभ्यासक्रमास मान्यता प्राप्त झाली आहे. ही मान्यता मिळणे हे खानदेश शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक प्रगतीतील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

प्रताप महाविद्यालयात B.B.A. व B.C.A. अभ्यासक्रम २००९-१० पासून सुरु करण्यात आला होता. त्यानंतर आता M.C.A. अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन दालन खुले झाले आहे.
या यशस्वी प्रयत्नासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश बिपीन गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए. निरज दिपचंद अग्रवाल, श्री. प्रदीप कुंदलाल अग्रवाल, श्री. हरी भिका वाणी, श्री. कल्याण साहेबराव पाटील, श्री. विनोद राजधर पाटील, डॉ. अनिल नथ्थु शिंदे, श्री. योगेश मधुसूदन मुंदडे, चिटणीस प्रा. पराग पी. पाटील, प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. किरण सूर्यवंशी, प्रा. रोहन गायकवाड, कुलसचिव श्री. राकेश निळे, मुख्य लिपिक श्री. भटू चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
M.C.A. अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ. माधुरी पाटील, उपाध्यक्ष श्री. जितेंद्र देशमुख, तसेच विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.