लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर: डॉ. संदीप जोशी अध्यक्ष, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर: सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात सक्रिय असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरच्या २०२५-२६ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. क्लबच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी एकमताने नवे पदाधिकारी निवडून दिले आहेत.
या कार्यकारिणीत डॉ. संदीप जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, महेंद्र पाटील यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच नितीन विंचूरकर हे खजिनदारपदाची धुरा सांभाळणार आहेत.
नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येत्या रविवारी, ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल मिड टाऊन, अमळनेर येथे पार पडणार आहे. या विशेष प्रसंगी ज्येष्ठ कलाकार, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अशोकजी समेळ तसेच पीजीडी गिरीशजी शिसोदिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लबच्या नव्या कार्यकारिणीमुळे आगामी वर्षात समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती मिळेल आणि नव्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.