दहशतवादी नाचनचा तिहार तुरुंगात मृत्यू

24 प्राईम न्युज 29 Jun 2025.

सिमी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा माजी पदाधिकारी आणि पुणे आयसिस मॉड्यूलमधील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये कैदेत असलेल्या नाचन याची प्रकृती बिघडल्यानेउपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे मेंदूतील रक्त्रावाने शनिवारी नाचन याचा मृत्यू झाला.
सिमीचा माजी प्रमुख
साकिब नाचन हा भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमी -या संघटनेचा माजी प्रमुख होता. गेल्या काही काळापासून साकिब नाचन हा दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये न्यायालयीन कोठडीत होता. सोमवारी प्रकृती बिघडल्याने – त्याला दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात – आले होते. तिथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने – त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान प्रकृती अधिकच बिघडून त्याचा मृत्यू झाला.
नाचन हा मुंबईतील बॉम्बस्फोटांमधील मुख्य आरोपी होता. त्यानंतर आयसिस मोड्युलमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये एनआयएने पुन्हा त्याला अटक केली होती. महाराष्ट्र आयसिसच्या दहशतवादी मॉड्यूलवर छाप्यादरम्यान एनआयएने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुका, धारदार शस्त्रे, गुन्ह्याची कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आणि काही जणांना ताब्यात घेतले, नाचन त्यापैकी एक होता. मृतदेह भिवंडीत आणणार
साकिब नाचन याचा मृतदेह भिवंडी येथील बोरिवली गावात आणण्यात येणार आहे, त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर, बोरिवली आणि पडघा या दोन्ही ठिकाणी २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली आहे.