धार येथे 30 जूनला अब्दुल रजाक कादरी बाबांचा संदल, 1 जुलैला उर्स यात्रा.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत सय्यद अब्दुल रजाक शाह कादरी पीर बाबांचा उर्स (यात्रा) दरवर्षी मोहरम महिन्याच्या 5 व्या तारखेला साजरा केला जातो. यावर्षी मोहरम महिन्याची चौथी तारीख म्हणजेच 30 जूनला संदल निघणार असून 1 जुलैला मुख्य उर्स यात्रा साजरी होणार आहे.
धार येथील सय्यद अब्दुल रजाक शाह पीर बाबा हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या यात्रेसाठी दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित राहतात.
उर्स यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व्यवस्थेची काळजी घेणे आवश्यक आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने नियोजित पार्किंगमध्ये लावावीत, असे आवाहन उर्स कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. कमिटीचे अध्यक्ष हाजी नईम मुजावर, उपाध्यक्ष हाजी कलीम मुजावर, सेक्रेटरी व्ही. एन. मुजावर आणि संचालक अलीम मुजावर, अलाउद्दीन मुजावर, गयास मुजावर, रफिक मुजावर, सलाउद्दीन मुजावर, असलम मुजावर, साजिद मुजावर, जमील मुजावर, युसुफ मुजावर, मुशीर मुजावर तसेच पंच कमिटीचे सदस्य चिराकुद्दीन मुजावर, बाबू पेंटर, गुड्डू मुजावर, शकील मुजावर यांनी ही माहिती दिली
रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांनी कृपया चेन पुलिंग करू नये. अमळनेर किंवा भोरटेक रेल्वे स्टेशनवरच उतरावे. चेन पुलिंग करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.