अमळनेरमध्ये कॉलेज अॅडमिशनसाठी आलेली शहापूरची १९ वर्षीय तरुणी बेपत्ता – कुटुंबीयांची तक्रार, पोलिसांकडून शोध सुरू

0

आबिद शेख/ अमळनेर



शहापूर येथून अमळनेरमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेली १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणीचा काहीही थांगपत्ता लागलेला नसून, तिच्या भावाने मारवड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

तरुणी मंगळवारी सकाळी ११ वाजता अमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी लहान बहिणीसह आली होती. प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, दुपारी तीनच्या सुमारास तिने लहान बहिणीला घरी परत पाठवले आणि आपण संध्याकाळी पाचच्या बसने परत येणार असल्याचे सांगितले. मात्र, ती घरी न परतल्याने नातेवाइकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.

एक दिवस उलटल्यानंतरही काहीही माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी अधिकृतरीत्या पोलिसांत तक्रार दिली. सध्या हवालदार मुकेश साळुंखे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, अमळनेर तालुक्यात अलीकडे तरुणींशी संबंधित अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून अधिक सतर्कतेची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!