अमळनेरमध्ये ‘नेत्रम’ नियंत्रण कक्षाचे उद्घाटन; कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी ‘नेत्रम’ ही अत्याधुनिक सिसीटीव्ही नियंत्रण यंत्रणा अमलात आणली आहे. या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणू नये तसेच आपल्या चुकलेल्या पाल्यांचे बचाव करणाऱ्या कुबड्या होऊ नये.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, डीवायएसपी विनायक कोते, तत्कालीन प्रभारी केदार बारबोले हे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून ‘नेत्रम’ यंत्रणा उभारण्यात आली असून अमळनेर शहरातील सर्व सिसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता थेट पोलीस स्टेशनमधून होणार आहे. रेड्डी यांनी सांगितले की, आमदार निधी आणि लोकसहभागातून बसवलेल्या कॅमेऱ्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आता पोलिसांकडेच असेल. ‘नेत्रम’ प्रणाली आणि ‘ई-बिट अॅप’च्या मदतीने पोलीस कार्यवाही अधिक गतिमान झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डीवायएसपी विनायक कोते यांनी माहिती दिली की, शहरातील विविध चौक व रस्ते सुमारे ११० कॅमेऱ्यांनी कव्हर करण्यात आले आहेत. इतर भागातील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडून संपूर्ण शहर व तालुका सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या यंत्रणेमागे तत्कालीन डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे विशेष योगदान राहिले आहे. जयश्री पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या विकास निधीतून या यंत्रणेची उभारणी झाल्याची माहिती दिली.
सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.
निकम यांनी यावेळी सांगितले की, अलिकडे मुलींच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि महिला दक्षता समितीच्या मदतीने शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत शाळांना पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. शीला पाटील, प्रमोदिनी पाटील, अलका गोसावी, भारती शिंदे तसेच डॉ. राजेंद्र पिंगळे, विक्रांत पाटील, मुख्तार खाटीक, महेंद्र बोरसे, जिजाबराव पाटील, योगेश महाजन, राकेश पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, इम्रान खाटीक, सलीम टोपी, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, आरिफ तेली, फिरोज मिस्तरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.