गायत्री भदाणे मॅडम यांचा 32 वर्षांच्या शैक्षणिक योगदानाला मन:पूर्वक मुजरा – सेवापूर्तीचा सन्मान सोहळा संपन्न..

आबिद शेख/अमळनेर

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. गायत्री चंद्रकांत भदाणे मॅडम यांनी आपल्या 32 वर्षांच्या तेजस्वी आणि विद्यार्थिप्रिय शैक्षणिक प्रवासाची यशस्वी सांगता करत आज सेवानिवृत्ती स्वीकारली. या खास प्रसंगी एक छोटेखानी, सौहार्दपूर्ण कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
गायत्री मॅडम यांनी शिक्षिका ते प्राचार्या असा प्रेरणादायी प्रवास करत हजारो विद्यार्थिनींच्या आयुष्यात शिक्षणाचा उजेड पेरला. गरजू, होतकरू विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य त्यांनी संवेदनशीलता, चिकाटी आणि निष्ठेच्या बळावर पार पाडलं. “उपेक्षितांना जवळ आणणं आणि होतकरूंना उभं करणं” हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दिसून आलं.
त्यांचा शिक्षणातला वारसा घरातूनच – वडील प्रसिद्ध वकील, आई रा.वि. संस्थेच्या संचालिका, भाऊ चार्टर्ड अकाउंटंट, तर पती मा. श्री. चंद्रकांत भदाणे हे वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत. कन्या कु. मनस्वी सध्या MBBS