जंगलातील अवैध उत्खननावर तहसीलदार नीता लबडे यांचा धाडसी छापा – ७ डंपर, १ जेसीबी जप्त..

0

24 प्राईम न्युज 1 Jul 2025


भुसावळ-जळगाव सीमेवरील नदीकाठच्या दाट जंगलात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर अंकुश बसवण्यासाठी भुसावळच्या तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी थेट कारवाई करत एक धाडसी पाऊल उचलले आहे. जंगलात तब्बल २ किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी आपल्या पथकासह ही कारवाई केली.

उंचसखल भाग, पडीत शिवार आणि दाट झाडीतून मार्ग काढत त्यांनी कोणतीही भीती किंवा अडथळ्याची तमा न बाळगता ही मोहीम यशस्वी केली.

कारवाईदरम्यान काही अवैध उत्खनन करणारी वाहने मुरूम रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लबडे यांचे प्रशासन, पोलीस आणि नगरपरिषदेच्या मदतीने जागीच कार्यवाही करत:

१ जेसीबी मशीन ७ डंपर वाहने जप्त करण्यात आली असून ती सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

तहसीलदार नीता लबडे यांचे हे धाडस, कार्यक्षमता आणि कायद्यावरील निष्ठा समाजासाठी आदर्श ठरत आहे. त्यांच्या या निर्णायक आणि निर्भीड कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कडक कार्यवाही म्हणजेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी स्पष्ट संदेश — “कायद्यापासून कुणीच सुटणार नाही!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!