छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सुमारे 650 नागरिकांनी घेतला लाभ..

0

आबिद शेख/अमळनेर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आणि गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन बळकटीकरण योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दिनांक 30 जून 2025 रोजी गुरुदत्त मंदिर, चिमणपूरी पिंपळे, ता. अमळनेर येथे आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन मा. जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद अमळनेर व माजी जिल्हा परिषद सदस्य जळगाव यांच्या हस्ते संपन्न झाले.
शिबिरामध्ये मा. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग, श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, नरेंद्र पाटील, गटविकास अधिकारी, प्रेमलता पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी, प्रशांत धमके, निवडणूक नायब तहसिलदार, राजेंद्र ढोले, संजय गांधी योजना नायब तहसिलदार तसेच तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात विविध विभागांनी आपापले स्टॉल्स उभारून सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे समाधान करत त्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला. यावेळी प्रमाणपत्रे आणि धनादेशांचे वाटप मा. जयश्रीताई पाटील व मा. नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात लाभ दिलेल्या सेवा आणि लाभार्थींची संख्या: अ. क्र. कार्यालय लाभार्थी संख्या / सेवा

1 पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय 76 नवीन व दुबार शिधापत्रिका
2 संगायो शाखा 343 डीबीटी प्रक्रिया पूर्ण
3 सेतु शाखा 02 नवीन अर्ज, 103 उत्पन्न दाखले, 29 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, 29 रहिवासी, 141 जात प्रमाणपत्र, 21 आधार नोंदणी, 51 आधार दुरुस्ती
4 महिला व बालविकास विभाग 03 जलतारा मान्यता, 03 Baby Care Kit वाटप

एकूण 600 ते 650 नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पाटील, उपशिक्षक आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय, मंगरुळ यांनी केले, तर प्रशांत धमके, निवडणूक नायब तहसिलदार यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!