रेल्वेचे नवे नियम आजपासून लागू – तिकीट बुकिंग, दरवाढ, प्रतीक्षा यादीत मोठे बदल..

0

24 प्राईम न्युज 1 Jul 2025


– भारतातील दररोज 2.3 कोटी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून काही महत्त्वाचे नियम बदल लागू केले आहेत. यामध्ये तिकीट दरवाढ, तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्यता, प्रतीक्षा यादी मर्यादा आणि आरक्षण यादीच्या वेळेत बदल आदींचा समावेश आहे.

तिकीट दरवाढ लागू

1 जुलैपासून वातानुकूलित (एसी) वर्गासाठी प्रति किमी २ पैसे, तर विनावातानुकूलित (नॉन एसी) वर्गासाठी प्रति किमी १ पैसा दरवाढ झाली आहे.
उदा. – ५०० किमी प्रवासासाठी एसीमध्ये १० रु. आणि नॉन एसीमध्ये ५ रु. जास्त खर्च येणार आहे.
या बदलामुळे रेल्वेला दरमहा सुमारे ९०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.

तत्काळ बुकिंगसाठी ‘आधार’ लिंक अनिवार्य

आता तत्काळ तिकिटासाठी आयआरसीटीसी खाते ‘आधार’शी संलग्न असणे बंधनकारक झाले आहे.

तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी केवळ आधार लिंक युजर्सलाच लॉगिन करता येईल.

एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत.

‘ओटीपी’ प्रमाणीकरण अनिवार्य

१५ जुलैपासून आधार संलग्न मोबाईलवर येणारा ओटीपी टाकल्याशिवाय तिकीट बुक होणार नाही.

काउंटरवरही तत्काळ तिकीट घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असेल.

आरक्षण यादी आता ८ तास आधी

रेल्वे गाडी निघण्यापूर्वी ८ तास आधी आरक्षण यादी तयार केली जाणार आहे यापूर्वी ही यादी ४ तास आधी तयार केली जात होती.

प्रतीक्षा यादी मर्यादा निश्चित

एसी वर्गासाठी प्रतीक्षा यादीची मर्यादा ६०% तर नॉन एसीसाठी ३०% पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.

हे नवे नियम प्रवासापूर्वी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तिकीट बुक करताना किंवा प्रवासात अडचणी येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!