आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलसाज, लॉकर वाटप व शैक्षणिक साहित्य तुला; अमळनेर बाजार समितीत पावसातही शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पावसाच्या सरींनाही न जुमानता हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव साजरा केला. या वेळी बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा सणानिमित्त पारंपरिक बैल साज वाटप, तसेच मापाडी कामगारांना लॉकर किल्ल्यांचे वितरण खासदार स्मिता वाघ व आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आमदार अनिल पाटील यांनी, “मतदारसंघ बागायती होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची साथ सोडणार नाही.” असा निर्धार व्यक्त केला. पुढील काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर परिषद आपल्या ताब्यात दिल्यास शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवून विकास साधू, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात सौ. जयश्री पाटील यांच्यासह आ. अनिल पाटील यांची फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. पाटील यांच्या शैक्षणिक साहित्य तुळशीचेही आयोजन करण्यात आले.
३००० शेतकऱ्यांना बैल साज घरपोच!
या कार्यक्रमात ३,००० बैलजोडी धारक शेतकऱ्यांसाठी पोळा सणाचे बैल साज वाटप करण्यात आले. यामध्ये बैलांच्या सजावटीचे साहित्य, विविध उपयोगी वस्तूंचा समावेश असलेली बॅग घरपोच पोहचवण्यात येणार आहे.
मापाडींसाठी स्वतंत्र लॉकर सुविधा – राज्यातील पहिली उपक्रमशील बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात काम करणाऱ्या शेकडो मापाड्यांसाठी लॉकरची सुविधा पुरवणारी ही राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे. यामुळे कामगारांना त्यांचे साहित्य व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक लॉकर उपलब्ध झाले आहेत.
शैक्षणिक साहित्य वाटप आणि संचालकांचा सत्कार

सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप थेट शाळांमध्ये जाऊन करण्यात येईल. बाजार समिती आज जिल्ह्यात क्रमांक १ व विभागात क्रमांक ३ वर आहे. तसेच शेतकरी निवास मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांना स्वस्त व चविष्ट भोजन उपलब्ध होणार आहे.
या वेळी विविध कार्यकारी सोसायट्यांचे नवनिर्वाचित चेअरमन, संचालक मंडळाचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी तर आभार उपसभापती सुरेश पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास खा. स्मिता वाघ, सौ. जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. अशोक पाटील, समाधान धनगर, प्रफुल्ल पाटील, सौ. सुषमा पाटील, सौ. पुष्पा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत पाटील, मुख्तार खाटिक, व इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ. उमेश राठोड व कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली. प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण बाजार समिती परिसर फुलून गेला होता.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट