अमळनेर तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर – महिला सरपंच पदासाठीही स्वतंत्र आरक्षण जाहीर..

आबिद शेख/अमळनेर

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेश क्रमांक ग्रामपं/ई ऑफिस/२०५३९१५ दिनांक ३० जून २०२५ नुसार अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले. दि. ०८ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता सरपंच पदासाठी आणि ४ वाजता महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.

या आधी ३० जानेवारी २०२५ रोजी १३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर झाली होती. यावेळी उर्वरित १०६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यासह एकूण ११९ ग्रामपंचायतींसाठीचे सरपंच आरक्षण निश्चित झाले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली अनु. जाती, अनु. जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठी अनु. जाती, अनु. जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गामध्ये आरक्षण सोडत पार पडली.
या वेळी विविध गावांतील सरपंच, ग्रामस्थ व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचे तपशील (थोडक्यात):
🔹 अनु. जाती प्रवर्गासाठी – नगाव खुर्द, रुंधाटी, शिरसाळे बु.
🔹 अनु. जाती महिला प्रवर्गासाठी – खडके, गोवर्धन, मेहेरगाव
🔹 अनु. जमाती महिला प्रवर्गासाठी – सुंदरपट्टी, लोणचारम, लॉढवे आदी
🔹 नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी – हिंगोणे खु., पिंपळे बु., मुंगसे, नांद्री, डांगर बु. आदी
🔹 नागरीकांचा मागास महिला प्रवर्गासाठी – दहिवद खु., लोण बु., एकरुखा, जळोद, चौबारी, तासखेडे आदी
🔹 सर्वसाधारण प्रवर्गासाठी – हिंगोणे प्र.ज., पिंगळवाडे, पाडळसे, ढेकुसिम, बोहरे, मांडळ, सात्री, कंडारी खु. आदी
🔹 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी – हिंगोणे बु., लोणसिम, तळवाडे, धार, बोदडे, मठगव्हाण, कलाली, बहादरवाडी, निमझरी, अमळगाव, एकलहरे, गंगापुरी, वासरे, झाडी, म्हसले, ढेकु खु. आदी
एकूण सरपंच आरक्षण प्रक्रिया शांततापूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट