गणपती हॉस्पिटलतर्फे भव्य आरोग्य शिबिर. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो रुग्णांना मोफत आरोग्यसेवा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात रक्तदाब, साखर, ईसीजी, नेत्र तपासणी आदी अनेक महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. तब्बल ₹5 हजार किंमतीच्या तपासण्या पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्याने रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला व समाधान व्यक्त केले.
सामान्य नागरिकांचे आरोग्य वेळोवेळी तपासले जावे व त्यांच्यात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरात डॉ. पंकज संतोष महाजन, डॉ. मयूर संतोष महाजन यांच्यासह गणपती हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअरची संपूर्ण वैद्यकीय टीम उपस्थित होती. त्यांनी प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून सन्मानपूर्वक सेवा देत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट