पिल्लू मशिद परिसरातील धोकादायक खड्डा बुजविण्याची रहिवाशांची मागणी..

24 प्राईम न्यूज 23 Jul 2025

धरणगाव – पिल्लू मशिद परिसरातील बेबी तलाव जवळील गल्लीत पुन्हा एकदा मोठा खड्डा निर्माण झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात रियाज फारूक बागवान यांनी नगरपालिकेकडे लेखी अर्ज देत तातडीने खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे.

अर्जात म्हटले आहे की, सुमारे आठ महिने पूर्वी या ठिकाणी खड्ड्याचे भरणाकाम करण्यात आले होते. मात्र पुन्हा त्याच ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला असून तो गल्लीच्या मध्यभागी असल्याने लहान मुले व वृद्ध व्यक्तींसाठी तो अत्यंत धोकादायक ठरत आहे.
पालिकेने सदर बाबीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर खड्डा बुजवावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट