अमळनेरमध्ये महारक्तदान शिबिरात ६६ बाटल्या रक्त संकलित…

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने अमळनेर शहरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ६६ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.

या शिबिराला युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, हरचंद लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल यांच्या वतीने स्वतंत्र रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली होती.
या यशस्वी शिबिरासाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, देविदास लांडगे, पांडुरंग महाजन, विजय राजपूत, उमेश वाले, भारती सोनवणे, राकेश पाटील, श्याम पाटील, कैलास भावसार, प्रीतपाल सिंग बग्गा, रमेश धनगर, दिलीप ठाकूर, रामभैय्या कलोसे, शिवा महाजन, विष्णू सैनानी, पिंटू चौधरी, दीपक भोई, बापू पाटील, श्याम भावसार आदींनी परिश्रम घेतले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट