एरंडोल तालुक्यातही घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार..,
एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांची माहिती.

एरंडोल (प्रतिनिधि,) एरंडोल तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांमधील मंजूर घरकुले ज्यांना प्रथम हप्ता देऊन शंभर दिवस कालावधी उलटला आहे असे लाभार्थी ज्यांना वारंवार एरंडोल पंचायत समितीतर्फे व ग्रामपंचायत तर्फे तोंडी सूचना व लेखी सूचना देऊनही बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही असे तालुक्यातील ४७७ प्रलंबित घरकुलांच्या लाभार्थ्यांवर लवकरच गुन्हे दाखल करणार अशी माहिती एरंडोल तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दादाजी जाधव यांनी दिली.
आवास योजनेअंतर्गत सन २०१६/१७ ते आज पर्यंत मंजूर परंतु प्रलंबित असलेली घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात सुचित करण्यात आलेले आहे तालुक्यातील ४७७ घरकुलांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे परंतु सदर लाभार्थी घरकुलाचे बांधकाम करण्यास इच्छुक नाही किंवा त्यांनी सुरुवात केलेली नाही अशा लाभार्थ्यांकडून अदा करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम वसूल करून त्यांना रद्द करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झालेले आहेत जे लाभार्थी अनुदान रक्कम परत करण्यास नकार देत आहेत अशा लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या स्वमालकीच्या/कुटुंब मालकीच्या मालमत्तेवर किंवा महसुली दप्तरी असलेल्या शेती सातबारा उताऱ्यावर किंवा लाभार्थी यांच्या स्थावर जंगम मालमत्तेवर बोजा बसवायच्या आदेश शासनाकडून प्राप्त झालेला आहे
घरकुलाचे बांधकाम सुरू न केल्याने लाभार्थी यांनी शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाचा गैरवापर केलेला असून सदर रक्कम शासनास परत करण्याबाबत त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत तसेच एरंडोल पंचायत समितीतर्फे लेखी व तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत तरीसुद्धा घरकुल बांधकामाबाबत त्यांनी काही एक हालचाल केलेली नाही व अनुदान देखील परत केलेले नाही अशा लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले.
दरम्यान विस्तार अधिकारी सामान्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची गावनिहाय संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आल्याचेही सांगण्यात आले.
कोट:-
प्रलंबित घरकुल लाभार्थ्यांवर येत्या पंधरा दिवसात गुन्हा दाखल करण्यात येतील त्यांना यापुढे घरकुल योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही याशिवाय त्यांना देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल.