कलागुरुनगर-रामनगर भागातील नागरिकांची रस्त्याच्या कामाबाबत नगरपालिकेकडे मागणी..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील कलागुरुनगर आणि रामनगर या भागातील नागरिकांना रस्त्याच्या अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या भागात राहणाऱ्या अनेक लोकांचे रोजच्या येण्या-जाण्याचे हाल होत असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट होते.

सध्या या परिसरातून ८० फुटी रोडचे काम सुरू आहे, मात्र त्या कामामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल साचला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास, कामगारांना कामावर जाण्यास तसेच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी नगरपालिकेकडे त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करून योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट