साने गुरुजी विद्यालयात विविध मंडळांची स्थापना : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर │ अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात भाषा मंडळ, गणित मंडळ, विज्ञान मंडळ, भूगोल मंडळ व इको क्लब यांची स्थापना उत्साहात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अशोक खंडेराव बाविस्कर होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक सुनिल पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात भाषा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विद्या दामोदर पाटील व सर्व भाषा शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध भाषांवर आधारित नाटिका सादर केली. गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, सर्व गणित शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पराग धनंजय कापडणीस या विद्यार्थ्याने गणिताविषयी माहिती दिली. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष हर्षल पवार, भूगोल मंडळाचे अध्यक्ष डी. वाय. पाटील, तसेच इको क्लबच्या अध्यक्षा शारदा उंबरकर व सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांची रुची निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मंडळांची भूमिका महत्त्वाची आहे. सुजाण नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
प्राचार्य डॉ. शेख यांनी मनोगत व्यक्त करताना साने गुरुजी विद्यालयातील उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. बाविस्कर म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, शिक्षक व संस्थाचालक नेहमी प्रयत्नशील असतात. शाळेतील प्रत्येक घटक प्रामाणिकपणे सेवा देतो याचा अभिमान आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर व शारदा उंबरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मनिष उघडे, समाधान पाटील, देवेंद्र महाजन, जयेश मासरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संस्थाचालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनसीसी, स्काऊट व इको क्लबच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट