चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या : चोरी गेलेली मोटरसायकल २४ तासात जप्त..


24 प्राईम न्यूज 28 Jul 2025
पारोळा -फिर्यादी ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी, रा. कोळपिंपरी, ता. पारोळा, जि. जळगाव यांच्या मालकीची हिरो कंपनीची मोटरसायकल (क्रमांक एम.एच. ५४ ए २१९५) अंदाजे ₹३५,००० किमतीची, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजेनंतर त्यांच्या घरासमोर अंगणातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सुनील हटकर यांच्या मार्फत सुरू होता. दरम्यान, माननीय प्रभारी अधिकारी पो.नि. सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गावातील अभय प्रवीण पाटील व त्याचा साथीदार यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले.
त्यानुसार तपास पथक तयार करून अमळनेर येथे सापळा लावण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी अभय पाटील यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली व मोटरसायकल मयूर तुळशीदास देवरे (रा. खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक) याच्याकडे असल्याचे सांगितले.
पथकाने मालेगाव येथे जाऊन आरोपी मयूर देवरे यालाही ताब्यात घेतले. दोघांनाही पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीस गेलेली ₹३५,००० किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन सानप, पो.ह. सुनील हटकर, पो.ह. प्रवीण पाटील, पो.ह. महेश पाटील, पो.अं. अनिल राठोड यांच्या पथकाने केली. या कामगिरीमुळे नागरिकांतून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट