भक्तिभावात न्हालेली विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा जल्लोषात पार..

आबिद शेख/अमळनेर

विद्या विहार कॉलनी येथील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने रविवार, दि. २७ जुलै रोजी जळोद ते अमळनेर अशी पायी कावळ यात्रा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. या यात्रेत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भाविकांनी सहभाग घेतला.

यात्रेची सुरुवात जळोद येथून झाली. तेथे अनिल साळूंखे व भैय्या साळूंखे यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासादरम्यान जयंत पाटील, योगेश वाल्हे आणि विकी जाधव यांनी नाश्ता व चहाची व्यवस्था केली होती.
या यात्रेत सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील यांच्यासह संजय पाटील, अशोक साळूंखे, अमोल पाटील, सुनील शिगांणे, प्रवीण गुजर, रोहित तेले, कल्पेश साळूंखे, नरेंद्र गुजर, मिलिंद वारुळे, विवेक पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भागीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, यश अहिरे, प्रवीण वाघ, सुभाष चव्हाण, विलास सोनवणे, दीपक गुजर, सिद्धार्थ पाटील यांच्यासह अनेक भक्त सहभागी झाले होते.
यात्रेदरम्यान ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण मार्ग भक्तीमय वातावरणात न्हालेला होता.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट