शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या राजेंद्र शंकरपुरे यांना ‘राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार.’

24 प्राईम न्यूज 29 Jul 2025
पिंपरी-चिंचवड — ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार २०२५’ आज पिंपरी-चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार राजेंद्र शंकरपुरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि समाज उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला. शंकरपुरे यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या उपक्रमांना समाजातील विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद लाभला आहे.
या आधीही त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नेशन्स प्राईड अवॉर्ड, महाराष्ट्र उद्योग सन्मान, नवभारत सेवा रत्न पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, राष्ट्रीय एकता वीरता पुरस्कार यांचा समावेश आहे.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचे आणखी एकदा कौतुक झाले असून, त्यांच्या गावासह संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.