रामचंद्र काळे यांना ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज रत्न पुरस्कार 2025’ने सन्मानित – साहित्य, समाजसेवा क्षेत्रातील योगदानाची दखल..

24 प्राईम न्यूज 29 Jul 2025
पिंपरी-चिंचवड (पुणे), दि. 26 जुलै 2025 :
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे आज ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन गौरव समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025” मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील वडले (ता. फलटण) येथील श्री. रामचंद्र भिवाजी काळे यांना “आदर्श लेखक / साहित्यिक” म्हणून सन्मानित करण्यात आले. साहित्य, समाजसेवा, इतिहास, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय असल्याने त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती, संत बागडे बाबा आश्रम, जत)
मा. वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे)
श्री. श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे)
श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार)
कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल)
मा. ममता भोई (अभिनेत्री व मिस इंडिया – खानदेश)
या मान्यवरांच्या हस्ते श्री. काळे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
श्री. रामचंद्र काळे यांना यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल खालील 10 राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत :
- राज्यस्तरीय मानवाधिकार सह्याद्री सन्मान गुणगौरव पुरस्कार – 2016
- राज्यस्तरीय आदिवासी समाज सेवक पुरस्कार – 2016
- राज्यस्तरीय मल्हाररत्न गौरव पुरस्कार – 2017
- राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार – 2017
- राज्यस्तरीय मुंबई संध्या वृत्तपत्रकारिता पुरस्कार – 2017
- राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2018
- पर्ल बिझनेस अवॉर्ड – 2021
- राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2024
- भारतीय गौरव सन्मान – 2025
- राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार – 2025
सातारा जिल्ह्यातून कौतुकाची लाट
या सन्मानाबद्दल सातारा जिल्ह्यातून, रा. प. सातारा विभागातून तसेच फलटण तालुक्यातून विविध स्तरांतून श्री. रामचंद्र काळे यांचे अभिनंदन आणि गौरव करण्यात येत आहे. त्यांच्या साहित्यिक व समाजोपयोगी कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील दखल संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
💐 हार्दिक अभिनंदन श्री. रामचंद्र काळे सर! 💐