अमळनेर तालुक्यात खताच्या वाढीव दरांविरोधात तक्रार; युवक तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांची कारवाईची मागणी..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील कृषी केंद्रांवर रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांना जास्त दराने विक्री केली जात असून, खत साठा उपलब्ध असूनही ‘खत उपलब्ध नाही’ असे सांगून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, असा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष श्री. रविंद्र भगवान पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, अमळनेर येथील साई कृष्णा फर्टीलायझर या दुकानातून त्यांनी युरिया खत रुपये ३००/- दराने खरेदी केल्याचे नमूद केले आहे. या व्यवहाराचे बिल व ऑनलाईन पेमेंटची पावती त्यांनी अर्जासोबत जोडली आहे.

श्री. पाटील यांनी यापूर्वी तालुका कृषी अधिकारी श्री. चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचेही नमूद केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, तालुका कृषी अधिकारी कृषी केंद्रांना पाठीशी घालत आहेत.
याप्रकरणी त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या तक्रारीची प्रत जिल्हा कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट