सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर नवे निर्बंध..

24 प्राईम न्यूज 29 Jul 2025

गणवेशातील फोटो, पदनाम, सरकारी लोगो पोस्ट करण्यास सक्त मनाई
नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई राज्य सरकारने आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया वापराबाबत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्बंध जारी केले आहेत. आता कोणताही कर्मचारी आपल्या खात्यावर गणवेशातील फोटो, पदनाम, शासकीय कार्यालयाचे लोगो किंवा सरकारी मालमत्तेचे फोटो/व्हिडीओ पोस्ट करू शकणार नाही.

राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या परिपत्रकात सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात स्पष्ट आणि कडक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, कोणतेही नकारात्मक, द्वेषमूलक किंवा फूट पाडणारे वक्तव्य पोस्ट किंवा शेअर केल्यास संबंधितावर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियम १९७९ अंतर्गत कारवाई केली जाईल.
परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे:
परवानगीशिवाय कोणतेही सरकारी दस्तऐवज पोस्ट/फॉरवर्ड करू नयेत
वैयक्तिक व शासकीय सोशल मीडिया खाती स्वतंत्र ठेवावीत
कोणतेही बंदी घातलेले अॅप्स वापरण्यास सक्त मनाई
शासकीय योजनांचा प्रचार फक्त परवानगी घेऊनच
फक्त ‘टीम यशस्वीतेची माहिती’ देता येईल, वैयक्तिक प्रसिद्धी नाही!
व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या माध्यमांचा वापर केवळ शासकीय कामकाजासाठीच करण्यास सांगण्यात आले आहे.
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा असला तरी, जबाबदारीने वागा, असा सल्लाही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट