मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे भवरलालजी जैन यांना खऱ्या स्वरूपात प्रणाम.आगीत नुकसान झालेल्याना आर्थिक सहाय्य..

जळगाव (प्रतिनिधि)२५ फेब्रुवारी श्रद्धेय डॉक्टर भवरलालजी जैन यांचा श्रद्धा वंदन दिन असल्याने त्यांना कृतज्ञतापूर्वक प्रणाम करण्यासाठी सकाळी लगबग चालू असताना दैनिक लोकमत मधील बातमी वाचण्यात आली की दोन सख्या भाऊ बहिणींच्या घराला आग लागून नुकसान झाले.
जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बीरादरीचे अध्यक्ष व डॉक्टर भवरलाल जैन यांचे सहकारी फारुख शेख यांनी भाऊंच्या श्रद्धा वंदन दिनी असोदा रस्त्यावरील मोहन टाकी समोर जाऊन आगीत नुकसान झालेल्या दोघी बहिण भावांना प्रत्यक्ष भेटून मोठे भाऊंच्या शिकवणी नुसार माणुसकी जपायची, प्रेम द्यायच,सग्या सोयरा पेक्षा शेजारील माणसांना प्रेम द्यावयाचे म्हणून फारुक शेख व त्यांच्या मानियार बिरादारीच्या सहकाऱ्यांनी या दोघी भाऊ आणि बहिणींना प्रत्येकी ५०००/- रुपयांचे आर्थिक सहकार्य करून श्रद्धेय डॉ भवरलालजी जैन यांच्या श्रद्धा वंदनदिनी कृतज्ञता पूर्वक प्रणाम सादर केला. या वेळी
फारूक शेख,सय्यद चाँद,
रऊफ शेख,शेख हारून
अल्ताफ शेख,अनिस शाह
मुजाहिद खान,मोहसीन शेख
असद शेख,सय्यद अस्वदअली,जुबेर मनीयार,
वसीम शेख, करामत शेख,
रफिक वायरमेन,चाँद खान आदी उपस्थित होते.